जिल्हा भंडारा पथक ची कार्यवाही…
हसन साहेबांनी मारला
“हतोडा“
भंडारा वार्ता:-पोलीस निरीक्षक तुमसर महादेव आचरेकर आणि भंडारा जिल्हा पथक च्या सयुक्त विद्यमाने झाली रेती माफीया वर कार्यवाही. ..
तुमसर चे पोलीस निरीक्षक यांच्या तीक्ष्ण नजरेत पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे, हेड कॉन्स्टेबल सतीश ढोंगी अवैध रेती उत्खनन करुन चोरी चे प्रयत्नात असनारे ट्रक्टर व ट्राली च्या चालक , मालक विरुद्ध कार्यवाही केली.

हा ट्रक्टर तुमसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत मौजा उमरखेडा येथील वैनगंगा नदी पात्रातून अवैध रित्या उत्खनन करून रेती चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना दोन ट्राली यांना जागीच पकडून चालक, मालक यांच्या विरुद्ध कार्यवाही करुन यांच्या ताब्यातील 11,51,000/-हजार रुपयांचा माल जप्त केला.
पुढील कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार तुमसर पोलीस स्टेशन चे ठानेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे करीत आहेत.



