पोलीस स्टेशन अंतर्गत रुट मार्च…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हातील पोलीस स्टेशन मध्ये कानुन व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी व सुरू असलेला गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद सण शांतीपूर्ण व्यवस्थेत पार पडावे याकरिता रुट मार्च चे आयोजन करण्यात आले होते.
अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आचरेकर साहेब तुमसर पोलीस स्टेशन तुमसर
यांच्या उपस्थितीत रुट मार्च चे आयोजन करण्यात आले. रुट मार्च तुमसर पोलीस स्टेशन, बावनकर चौक, जामा मस्जिद, मुक्ताबाई चौक, नांगी चौक, , बडा बाजार चौक, गांधी चौक, सराफा लाईन, जुना बस स्थानक, बजाज नगर, तांबी चौक मार्गे पोलीस स्टेशन येथे समापन झाला. पब्लिक ॲड्रेस सिस्टम माईक द्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद हे त्यौहार शांततेत पार पाडावे अनुषंगाने या अनुषंगाने तुमसर शहर नागरिकांना आवाहन करण्यात आले. रुट मार्च दरम्यान 12 अधिकारी, दंगा नियंत्रण पथक, SRPF असे एकूण सैनिक 12 अधिकारी , 121अंमलदार 78 सैनिक हजर होते.