Uncategorized

चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात…

तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस हद्दीत रुपये चोरीची घटना उघडकीस आली.
प्रकरण असे की फिर्यादी चंपालाल परसराम रहांगडाले राह. श्रीराम नगर तुमसर याने मित्राकडून काही कामानिमित्त 60,000 रुपये उधारी मांगुन आणले व घरी कपाटाच्या ड्रावर मध्ये रक्कम ठेवलेली काही दिवसांनी कामानिमित्त रुपयांची आवश्यकता पडल्याने ड्रावर मध्ये ठेवलेली रक्कम चोरी झाल्याची घटना आढळली नंतर त्याने चोरीची तक्रार दिल्याने अप. क्र. 443/2024 कलम 305( अ) गुन्हा नोंद करून तपास घेण्यात आले.


सदर गुन्ह्याचा तपास

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) , पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर

यांच्या मार्गदर्शनास घटनेच्या तारखेपासून फिर्यादी च्या घरी जाणारे येणाऱे ईसमाचा शोध घेतला यामध्ये मनीस नन्ने केबल वितरक यांच्या कडे मजुरी ने काम करणारा ऑपरेटर आरोपी लखन प्रसाद नंदु कनोजे राह. रविदास नगर तुमसर याला ताब्यात घेऊन अटक करुन चोरी केलेली संपूर्ण रक्कम 60 , 000/-रु.हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणून न्यायालयीन कोठडीत आरोपी ची रवानगी केली.
यामध्ये कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पो उपनि प्रविण पाटील, पोउपनि. धर्मेंद्र बोरकर, पो. अंमलदार मार्कड डोरले, नितीन झंडाड, परीमल मुलकवार, राजकुमार गिरेपुंजे यांनी अथक परिश्रम व कौशल्य पुर्ण तपास करुन आरोपी चा शोध घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button