सामाजिक संघटनेच्या सहकार्याने चांगले प्रशासन देऊ-जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हात येताच जिल्ह्यातील कानुन व्यवस्था चे कडेकोट पण पालन होण्यासाठी नवनियुक्त
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन
यांनी सर्वच समाजातील लोकांना पोलीस मुख्यालयी बोलवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण सुध्दा केले.

त्यांनी जिल्ह्यातील स्वयंसेवी सामाजिक संघटनाची बैठक घेतली. त्यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून अडी अडचणी जाणून घेतल्या. आजच्या आधुनिक युगात समाजात कितीतरी प्रकारचे अचानक प्रश्न निर्माण होतात. कायदा व सुव्यवस्था राखण्याची परिस्थिती निर्माण होते. त्याचे निराकरण करण्यासाठी सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस विभाग उपाययोजना राखण्यासाठी सतर्क असतात. सामाजिक संघटनांनी अशा वेळेस सहकार्य करावे असे प्रतिपादन मा. पोलीस अधीक्षकांनी बैठकीत सांगितले.

(जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भंडारा यांचा स्वागत करतांना अध्यक्ष भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार मराठी पत्रकार संघ राजेश ऊके)
बैठकीत प्रामुख्याने लायन्स क्लब, ब्रास सिटी, रेडक्रॉस असोसिएशन, मेटल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, मुस्लिम स्वंयसेवी संघटना, जनकल्याण सोसायटी, फॉय वाईल्ड पत संस्था, माय वंनस्वरक्षण संस्था, व्यापारी संघटना, नेचर क्लब, सृष्टी फाऊंडेशन, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज संस्था, दलित संघटना, हिंदू संघटना, आदी स्वंयसेवी संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.