क्राइम

तुमसर शहरात एकाच दिवशी पाच घरफोडी…

भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एकाच दिवशी पाच घरफोडी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की तुमसर शहरातील नगरपालिका चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साळुंके यांच्या घरासह पाच ठिकाणी एकाच रात्री घरफोडी ची घटना घडली आहे. हि घटना तुमसर शहरातील श्रीराम नगर येथे एकाच प्रभागात घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराच्या आवारातील दुचाकी सह मुद्दे माल चोरी केले.

यामध्ये पंचायत समिती कर्मचारी महेश ईखार, शिक्षक अजय पटले, जया बांते (पती ऑर्मी ऑफिसर), मॉईल अधिकारी धनराज रहांगडाले, पंकज बडवाईक यांच्या घरातून लाखो रुपयांचे साहित्य व दोन मोटारसायकल चोरी करण्यात आले. हे सर्व पिडीत नातेवाईकाकडे बाहेर गावी गेले असल्याने चोरट्यांनी कुलुप बंद घरात साधल्याचे चित्र समोर आले. चोरीची घटना उघडकीस येताच तुमसर पोलीसांची चांगलीच खळबळ माजली आहे.

तुमसर पोलीस ठाण्या हद्दीत जुलै महिन्यात दहा घरफोडी च्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये विनोबा नगर येथील सेवानिवृत्त पोलीस शास्त्री, देव्हाडी येथे मनुका अटराये, दुर्गा नगरातील प्रंशात रंगारी, अविनास ईलमे, अशा दहा घरफोडी च्या घटना तुमसर शहरात घडल्या आहेत. बातमी प्रकाशित होईपर्यंत चोरटे पोलीसांच्या हाती लागले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button