Uncategorized
राज्य शासनानी माझा लाडला भाऊ योजनेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना कामगार विमा व नुकसान भरपाई कायदा लागू करावे. – सामाजिक कार्यकर्ते अश्विन देशमुख यांची मागणी
भंडारा :- राज्य शासनानी नुकतीच विविध योजना काढल्या त्यात बेरोजगार तरुणांना करिता ” लाडला भाऊ योजना” काढली ज्या मध्ये तरुणांना खासगी कंपनी व आस्थापना विविध क्षेत्रा मध्ये 6 महिन्याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण करत असतानी प्रशिक्षनार्थी तरुणाला एखादी इजा किंवा जीवितहानी झाल्यास त्याला जो कामगार विमा कायदा व नुकसान भरपाई कायदा आहे तो लागू नसल्यामुळे तरुणाला फार मोठ्या संकटाला समोर जावे लागेल करिता शासनानी युवकांचे भवितव्य लक्षात घेता हे कायदे लागू करावे.

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्विन देशमुख यांनी शासनाकडे डीजीटल मिडिया व वृतपत्र चा माध्यमातून केली आहे.
