जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी यांच्या प्रयत्नाने पांजरा गावात लालपरीचे आगमन…
तुमसर- मोहाळी वार्ता:- स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मोहाडी तालुक्यातील कांद्री जवळ पांजरा (ग्रामदान) गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची बसची सुविधा उपलब्ध झाली नव्हती. भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती मा. रमेशभाऊ पारधी यांच्याकडे गावातील पदाधिकारी व शशिकांतजी नागफासे यांनी आपली व्यथा मांडली असता मा. सभापती महोदयांनी पुढाकार घेऊन प्रथमताह गावामध्ये दिनांक 19/07/2024 ला लालपरीचे आगमन झाले.


तुमसर बस स्थानकामधून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बसचे भाडे काढून स्वतःह प्रवास करीत पांजरा गावापर्यंत गेले.
लालपरीचे आगमन होताच गावामध्ये ढोल तास्याच्या गजरामध्ये लालपरीचे स्वागत करण्यात आले त्यावेळी ग्रामवासिया तर्फे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मा. रमेशभाऊ पारधी सभापती शिक्षण व आरोग्य विभाग, अमरजी रगडे माजी नगराध्यक्ष, प्रमोदजी कटरे तालुका अध्यक्ष, शंकरभाऊ राऊत, गजाननजी झंझाड, कान्हाभाऊ बावनकर, महेंद्रजी मेश्राम, शिवभाऊ बोरकर,
शशिकांतजी नागफासे, महेंद्रजी मते ग्रामध्यक्ष, रामदासजी खडसे, गावातील ग्रामवासी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.