अमोल पोरेड्डीवार तलाठी, भंडारा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात…

संपुर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहचलेला
“पोलीस कि आवाज न्युज”
भंडारा जिल्हा वार्ता:-
पोलीस उप अधीक्षक अरुण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा

ह्या कार्यालयात पद सांभाळताच जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विक्रम गाठुन लाचलुचपत घेणाऱ्या वर आळा बसविला आहे.

भंडारा तालुक्यातील मौजा नेरी येथील तलाठी अमोल शरद पोरेड्डीवार हे तलाठी पदावर होते.
तक्रार दाराच्या पत्नीच्या नावाने मौजा नेरी येथील उपविभाग ८४३ गट नं. शेती मध्ये दोन वर्षे पुर्वी बोअरवेल तयार केली होती त्या बोअरवेल ची नोंद सात बारा व नकाशा वर नोंद करण्यासाठी तक्रार दाराने तलाठी कार्यालयात अर्ज केले होते. सदर बोअरवेल ची नोंद करण्याकरिता अर्जदाराला
७००/-(सातसे रुपयांची) मांडवी
केल्याची तक्रार भंडारा लाचलुचपत विभागाला केली होती. लाचलुचपत विभागातील पोलीस उप अधीक्षक अरुण कुमार लोहार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी सापळा रचुन अमोल पोरेड्डीवार तलाठी यांना पंचासमक्ष तक्रारदार यांच्या कडून सातसे रुपयाची लाच रक्कम स्वतः स्विकाराली सदर तक्रारी ची नोंद पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.



