क्राइम
तो कोण मुख्य अधिकारी जो रेती तस्करांना पनाह देतोय?
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येत लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती तस्करी करून ट्रक्टर च्या साहाय्याने नेली जाते ह्यावर महसूल विभागाचे अधिकारी /कर्मचारी कोणत्याही प्रकारची भुमिका घेत नसल्याने निदर्शनास आले. मग ह्यामध्ये त्यांचे हितगुज संबंध असल्याचे परिसरातील जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे.





आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, धुटेरा, येथील तलाठी व मंडळ अधिकारी डोळे का बंद करून आहेत? असा प्रश्न परिसरातील जनतेच्या मनात आहेत.
रात्री ला टीप्पर च्या साहाय्याने रेती भरलेले टीप्पर पंधरा ते विस दररोज जातात मग प्रशासनाला दिसत नाही का❓ असा सुध्दा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे.

बातमी प्रकाशित होताच तालुका व जिल्हा स्तरावर महसूल अधिकारी कोणते पाऊल उचलतात ह्याकडे लोकांचे लक्ष केंद्रित आहे.




