औषधी निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन भंडारा यांच्यावर सापळा रचुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातुन मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार याच्या भावसुनेच्या नावाने किर्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये औषध दुकान सुरु करण्यासाठी तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासन भंडारा यांच्या कडे अर्ज दिला होता , अर्जदार याने फार्मसी च्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या न काढल्याने फार्मसी चा परवाना मंजूर करण्यात आला आहे,त्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराला 20,000 हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्यासी संपर्क साधुन विभागामार्फत सापळा रचून पंचासमोर श्री प्रशांत राजेन्द्र रामटेके औषधी निरीक्षक अन्न व औषधी प्रशासन भंडारा यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ह्या कार्यवाही ला राहुल माखनीकर सर व पोलीस उपअधीक्षक लाप्रवि भंडारा डॉ.अरुन कुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अमित डहारे पोलीस निरीक्षक लाप्रवि,श्री.संजय कुजंरकर व त्यांच्या पथकाने सहकार्य केले.




