ऑनलाईन पद्धतीने काढलेली रक्कम परत आनण्यास भंडारा सायबर पथकाला यश
संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा वार्ता- आतापर्यंत लोकांचा गैरसमज होता कि परत गेलेली रक्कम खात्यात जमा होत नाही पण पोलीस अधीक्षक भंडारा (लोहित मतानी) यांच्या मार्गदर्शनाखाली “सायबर पोलीस भंडारा” यांनी रक्कम परत आणुन लोकांचा गैरसमज दुर केला .
भंडारा पोलीस स्टे तर्गत तक्रारदार नामे भारत भोंगाडे राह.गणेशपुर भंडारा यांना त्यांच्या क्रेडिट कार्ड मधुन रक्कम कपात झाल्याचा मॅसेज आला असताना त्यांनी लगेच सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे धाव घेतल्याने सायबर पोलीस यांनी तांत्रिक पद्धतीने माहिती काढली त्यावरुन त्यांची रक्कम विविध कंपन्यांचे व्यापाऱ्यांकडे गेले असल्याची माहिती मिळाली, त्याअनुषंगाने वेळ न घालवता सायबर पोलीस भंडारा यांनी कंपन्यांनी चे नोडल अधिकारी यांना E-mail पाठवुन व मोबाईल फोन वर संपर्क साधुन कपात झालेली रक्कम तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डवर जमा करण्यात आली.

*तक्रारदार यांची *60,000* रुपयांची फसवणूक केलेली रक्कम त्यांच्या खात्यात तात्काळ जमा झाली.
तक्रारदाराने पोलीस अधीक्षक , लोहित मतानी,अपर पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे तसेच सायबर पोलीस निरीक्षक, राहुल देशपांडे तसेच सायबर पोलीस पथकाचे आभार मानले.



