भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यातील प्रकरण:- लाचलुचपत विभागामार्फत ग्रामपंचायत नवेगाव मधिल ग्रामसेवक आणि शिपाई यांच्यावर सापळा रचुन कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
केन्द्र शासन व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वेतन लाभ होतो,पण आताही त्यांची लाच घेण्याची सवय आहे, परंतु एखादा विद्वान जर व्यक्ती त्याच्या संपर्कात आला तर अशा घटना घडुन नोकरीला हाथ धुवावे लागते!
असेच एक प्रकरण
भंडारा जिल्हा लाचलुचपत विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार
सविस्तर वृत्त असे की मोहाळी तालुक्यातील नवेगाव (बुर्ज) ग्रामपंचायत मध्ये तक्रारदार यांच्या वडिलांचे नावाने घरकुलाची मंजुरी मिळाल्यानंतर वडील कालांतराने मरण पावल्याने तो घरकुल आईच्या नावाने स्थानांतरण झाले काही दिवसांनी आईसुद्धा मरण पावल्याने तो घरकुल तक्रारदाराच्या नावाने हस्तांतरित करण्याची ग्रामपंचायतच्या ठरावाला लागणारे कागदपत्र तयार करण्यासाठी आरोपी क्रं.१) (ग्रामसेवक) धनंजय रामचंद्र लांजेवार, आरोपी क्रं.२) लालचंद गोपिचंद चकोले (शिपाई) यांनी ७,००० रु.लाचेची मागणी केली होती त्याकरिता तक्रारीदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ला कळवले व त्यांनी सापळा रचुन पोलीस स्टेशन करडी जिल्हा -भंडारा ला सदर प्रकरणाची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

ह्या कार्यवाही च्या मार्गदर्शनाखाली माखनीकर सर (पोलीस अधीक्षक लाप्रवि नागपुर), माननिय अरुन कुमार लोहार (पोलीस उपअधीक्षक लाप्रवि भंडारा),तपासणी अधिकारी अमीत डहारे, पोलीस निरीक्षक लाप्रवि.भंडारा ,सापळा कार्यवाही कमलेश सोनटक्के (पोलीस निरीक्षक लाप्रवि),पोहवा मिथुन चांदेवार, अंकुश गाढवे,पोना.अतुल मेश्राम,शिल्पेन्द्र मेश्राम,पोहवा.चेतन पोटे, विवेक रनदिवे,मयुर सिंगनजुडे,चालक राहुल राऊत यांनी सहकार्य केले.



