Uncategorized

भंडारा जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचुन कार्यवाही

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

★ *पोलीस कि आवाज*★

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता*:- भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार “सापळा कारवाई”

घटक :- भंडारा*
तक्रारदार* :- पुरूष , वय 34 वर्षे, रा. श्रीराम नगर तुमसर, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा व्यवसाय शेती.
मूळ पत्ता – आसलपाणी, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा.

आरोपी लोकसेवक* :-

1) श्री. गणेश महाजन काकरवाल, वय 27 वर्ष, वनरक्षक, वर्ग 3
2) श्री. मनीष उत्तम मेश्राम , वय 32 वर्ष, वनरक्षक,
3) श्री. केसरी रामासाव उचीबगले , वय 52 वर्ष, वनमजुर, रा. लोहारा पोस्ट जाम तालुका तुमसर जिल्हा भंडारा इतर लोकसेवक
तिन्ही वनपरिक्षेत्र कार्यालय लेंडेझरी, तालुका तुमसर जिल्हा भंडारा
4) मो. शहाबुद्दीन मो. दाउद अन्सारी, वय 19 वर्ष, धंदा मजुरी, मूळ पत्ता – एकता नगर वंजारा पिली, नदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नागपुर खाजगी इसम

लाच मागणी रक्कम :- 
आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी 25,000/- रुपये ची मागणी करून 3000/- रुपये नगदी आणि 2,000/- रुपये ऑनलाईन पेमेन्ट द्वारे सुरवातीला स्विकारले आणि नंतर उर्वरित 20,000/- रुपयांची पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक 3 यांचे माध्यस्थीने तडजोडीअंती 15,000/- रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवुन आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आरोपी क्रमांक 4 यांचे हस्ते सापळा कारवाही दरम्यान 15,000/- रुपये स्विकारले. (तडजोडीअंती एकूण मागणी केलेल्या रकमेपैकी 5,000/- रुपये च्या चलनी नोटा स्विकारून उर्वरित 10,000/- रुपयांच्या डमी नोटा तक्रारदार यांना परत केल्या.)
कारण :-  तक्रारदार यांचेकडे स्वतःचा ट्रॅक्टर असून ते रेती वाहतुकीचा व्यवसाय करतात. दिनांक 13/08/2022 रोजी आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर पकडला व त्यांना ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 25,000/- रुपयांची मागणी केली होती. घटनास्थळी 5,000/- रुपये स्वीकारुन उर्वरित रक्कम 20,000/- रुपयापैकी आरोपी क्रमांक 3 यांच्या मध्यस्थीने तडजोडीअंती 15,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
दिनांक 25/08/2022 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आरोपी क्रमांक 4 यांचे हस्ते 15,000/- रुपये लाच रक्कम स्विकारून रकमेपैकी पाचशे रुपयांच्या 10 चलनी नोटा असे एकूण 5,000/- रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 10,000/- रुपये च्या डमी नोटा तक्रारदार यांना परत केल्या. नमूद आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता आरोपी क्रमांक 3 यांच्या मध्यस्थीने तडजोड करून लाच रकमेची मागणी केली व आरोपी क्रमांक 4 यांचे हस्ते लाच रक्कम स्विकारल्याले पोलीस स्टेशन आंधळगाव, जिल्हा भंडारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मार्गदर्शन* : मा.श्री. राकेश ओला सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
मा.श्री मधुकर गिते सर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर
श्री. महेश चाटे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, भंडारा.

तपासी अधिकारी :- श्री. अमित डहारे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. भंडारा.

सापळा कारवाई पथक :-  श्री. अमित डहारे, पोलीस निरीक्षक, श्री. कमलेश सोनटक्के, पोलीस निरीक्षक, स. फौ. संजय कुंजरकर, पोलीस नायक अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, मिथुन चांदेवार, चेतन पोटे, पोलीस अंमलदार विवेक रणदिवे, विष्णू वरठी, राजकुमार लेंडे, कुणाल कडव सर्व ला.प्र.वि. भंडारा.

भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा
*दुरध्वनी 07184-252661
*पोलिस उप अधीक्षक श्री. महेश चाटे*
मो.क्र.- 9823408344
पोलिस निरीक्षक, कमलेश सोनटक्के.
मोबाईल 9422644538
श्री. अमित डहारे, पोलीस निरीक्षक
मोबाईल 09823240129

@ टोल फ्रि क्रं. 1064

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button