अखेर बावनथडी पुलाचे बांधकामाला शासन दरबारी मंजुरी


९६ कोटींचा रुपयांच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी
आ. राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
संजीव भांबोरे/राजेश ऊके(मुख्य संपादक व टीम )द्वारा
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या आंतरराज्यीय सीमेवरील बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून या पुलावरील जड वाहतूक दोन वर्षां पासून बंद करण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने १०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु या ना त्या कारणाने सदर प्रस्ताव शासन दरबारी अडून होते मात्र आ. राजू कारेमोरे यांनी सतत पाठपुरावा करत राहिल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून शासनाकडून ९६ कोटी रुपये मंजूर करून घेतल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाºया कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. नागपूर-मनसर-सिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बावनथडी नदीपुलावरून वळविण्यात आली होती. परिणामी अतिभाराचे ट्रक तसेच मोठ्या वाहनांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अधिभाराची वाहतूक होत असल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला. पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता बळावली होती. परिणामी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सप्टेंबर २०२० पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूल बंद केला होता. त्यामुळे दोन राज्यातील संपूर्ण व्यवहार ठप्प पडले होते. रोजी रोटी चा प्रश्न बळावला होता. नागरिकांची ओरड सुरू झाली असताना
रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी आ राजू कारेमोरे यांना भेटून पुलाचे महत्व समजावून सांगितले असता आ राजू कारेमोरे हा प्रश्न लावून धरला होता व बांधकाम विभागा कडून १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. नवीन पूल बांधकामासाठी १०० कोटींचा प्रस्तावाला मंजुरी मिळेलस्तोवर व पुलाचे बांधकाम पूर्ण होईस्तोवर नदीपात्रात रपटा टाकून वाहतूक सुरू करता यावी यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली . व त्यावरून जड व हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू केली. परंतु पावसाळ्यात व धरणातून पाण्याचा विसर्ग होताच नदीतील रपटा वाहून जात असल्याने नेहमीच नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता
त्यामुळे भंडारा बांधकाम विभागाने आ. राजू कारेमोरे यांच्यामार्फत नवीन पुलाच्या बांधकामासाठी १०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता अखेर आ राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नाने शासनाने ९६ कोटी रुपयांचा प्रस्तावाला मंजुरी दिली
कोट:-
पुलाचे बांधकाम रडखडल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांच्या रोजी रोटी चा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे जातीने लक्ष घालून निधी मंजूर करून दिल्याचा मोठा समाधान होत आहे
राजू कारेमोरे
तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र


