Uncategorized

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल>★पोलीस कि आवाज★> आझादी चा अम्रुत महोत्सव

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क //चँनल

■■पोलीस कि आवाज■■

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत
अंगणवाडी क्रेंद सोनुली
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प भंडारा,
ग्रामीण बीट मोहदुरा अंगणवाडी केंद्र सोनुली येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत
“हर घर तिरंगा”
या आनंद उत्सवा निमित्ताने 3ते 6 वयोगटातील मुलांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत
“हर घर तिरंगा”
या उपक्रमाअंतर्गत
13ऑगस्ट ते 17ऑगस्ट
या कालावधीत सोनुली गावात झेंडा वाटप करण्यात आले,
तसेच गावात वृक्षरोपण करण्यात आले,
बचत गटांतील महिला, मुले आणि इतर नागरिकांना मोबाईल चे दुष्परिणामबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरी मुलींची सभा घेऊन त्यांना समुपदेशन देण्यात आले.
ग्रा. पं. सोनुली सरपंच, उपसरपंच, आणि इतर सदस्य यांच्याकडून 2 दिवस अंगणवाडीतील मुलांना गोपाळ पंगत देण्यात आली.
तसेच ध्वजारोहण करून मानवंदना करण्यात आली. व ग्राम पंचायत इतर सदस्य वर्गाकडून 5दिवस फळं पंगत देण्यात आली.
सदर कार्यक्रमात सरपंच सौ. दिपाली कुरंजेकर, उपसरपंच श्री रवींद्र वैद्य, आणि तसेच ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग इतर सदस्य वर्ग, तसेच अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका वर्षा मेंढे सी आर पी मॅडम, आणि या कार्यक्रमाची शान म्हणून गावातील समस्त मोठ्या प्रमाणात नागरिकांचं यात सहभागी होते.
*पोलीस कि आवाज*
न्युज नेटवर्क//चँनल
पुरुष प्रतिनिधी
आधार निर्वाण
तह. मोहाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button