अड्याळ येथे उत्साहात स्वतंत्र दिन साजरा


पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क :::::
मदरसाच्या लहान मुलांनी दिला एकात्मताच्या संदेश
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अडयाळ मध्ये स्वतंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावर्षी 75 वा आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त मदिना मस्जिद अध्यक्ष सोहेल खान यांच्या सौजन्याने लहान मुलांनी भारत माता म्हणून अफशिन सलीम पठाण, महात्मा गांधी म्हणून अफ्फान निसार पठाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आसिफ शेख, हिंदू म्हणून आतिफ वाजीद शेख, मुस्लिम म्हणून हाशिर वसीम पठाण, सिख म्हणून सीजान आरिफ शेख, ईसाई म्हणून उमर अब्दुरब शेख यांनी भारत माता, महात्मा गांधी, डा. बाबासाहेब आंबेडकर व हिंदू मुस्लिम सिख ईसाई असे वेश धारण करून एकात्मतेच्या संदेश दिला या मुलांनी अडयाळवासीयांचे लक्ष केंद्रित करून त्यांचे मन आकर्षित केले असून सर्व उपस्थित्यांनी मुलांसोबत सेल्फी काढून त्यांचे मनोबल वाढविले.
तसेच प्रत्येक शाळा शासकीय कार्यालयत ध्वजारोहण करण्यात आले पोलीस स्टेशनमध्ये थानेदार सुधीर बोरकुटे साहेब, गुजरी चौक येथे माननीय सरपंच जयश्रीताई कुंभलकर, नायब तहसील कार्यालय ग्रामपंचायत अडयाळ येथे नायब तहसीलदार अरुणा देशभरात मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये नायब तहसीलदार अरुणा देशभरात, सरपंच जयश्रीताई कुंभलकर, ग्रामविकास अधिकारी मोहाड साहेब, मंडल अधिकारी शेंडे साहेब, तलाठी शैलेश उपासे साहेब, मोरे साहेब, रेहान सय्यद साहेब, सुरवशे मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष मुनेश्वरजी बदलकर, समस्त ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मदिना मजद अध्यक्ष सोहेल खान, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा शिवशंकर मुंगाटे, पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस शिपाई व शाळेतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच या अमृत महोत्सवी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस मित्र म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संरक्षण टीमला प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
