पिडित महिलेच्या कुटुंबीयांना शिवसैनिकांची सांत्वन भेट



गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडीपार येथील अत्याचार प्रकरण
मुख्य आरोपी आतापर्यंत पोलीसांच्या ताब्यात नाही
पुर्ण देशात चर्चेचा विषय
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
■■पोलीस कि आवाज■■
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडीपार व भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येथे एका मोटारसायकल सवाराने जंगलात अत्याचार केले. कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कान्हाळमोह गावात गोंदिया जिल्ह्यातीलक्षआरोपी ने येथील महिलेवर अमानुष अत्याचार केले आरोपी नराधमांनी तिला गंभीर जखमा करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते.
नंतर लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत धर्मा धाब्यावर आल्यावर एका पंचर दुकानदाराला आपबिती सांगितली पण त्याने तिला विश्वासात घेऊन दुकानदार व ग्राहकाने एका शेतावर नेऊन रात्रभर अत्याचार केला पिडिता ची गुन्हा नोंद सुध्दा लाखनी पोलिसांनी घेतली नाही त्या मा.पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी साहेबांनी दोन पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित केले तर एका महिला कर्मचाऱ्याची तात्काळ बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली. ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील कारधा, लाखनी व गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घटना आहे. आतापर्यंत मुख्य आरोपी सापडला नाही. ह्या बाबिकडे केन्द्रीय ग्रुहविभागाने लक्ष देऊन {CBI} जांच करून दोशिंना सजा देण्याची मांग राजेश ऊके ,मुख्यसंपादक ,राजेश ऊके ,पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* व देवेंद्र दमाहे पत्रकार यांनी मागणी केली.सध्या ही पिडीता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. सदर महिलेला अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा. असे परखड मत शिवसेना नेत्या प्रवक्ता एडवोकेट डॉक्टर सुषमा अंधारे यांनी मांडले. गोरेगांव तालुक्यातील कमरगांव येथे पिडित महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्षाच्यावतीने सांत्वन भेट देण्यात आली.
यावेळी शिवसेना पक्षाकडून शिवसेना पक्षप्रवक्ता विधान परिषद आमदार डॉक्टर मीना कायंदे, शिवसेना नेत्या प्रवक्ता एडवोकेट डॉक्टर सुषमा अंधारे, शिवसेना पक्ष प्रवक्ता संजना घाटी, गोंदिया भंडारा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव, गोंदिया जिल्हा समन्वयक सुनील लांजेवार, गोरेगाव तालुका प्रमुख मेघराज चौधरी, युवा नेता युवा सेना तालुका प्रमुख हंसराज तिघारे, तालुका प्रचारक अभय गमदरे, तालुका सचिव आविराज बोभाडे तालुका समन्वयक मुकेश सहारे, तालुका संघटक देवानंद येडणे, अजय बिजेवार व समस्त शिवसेना तालुका पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दिल्लीतील “निर्भया” प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. ह्या घटनेतील पिडीतेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच ह्या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी. असेही यावेळी शिवसेना नेत्या प्रवक्ता एडवोकेट डॉक्टर सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.