Uncategorized

कोल्हापूर येथे संजीव भांबोरे यांना पत्रकार क्षेत्रातील राष्ट्रीय राजश्री शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

भारतातील प्रथम क्रमांकावर असलेला न्युज नेटवर्क//चँनल

■■पोलीस कि आवाज■■

भंडारा – येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनेशी निगडित असलेले व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव मुरारी भांबोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. कृष्णदेव गिरी सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा 2022 चा पत्रकार क्षेत्रातील राष्ट्रीय राजश्री शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन कोल्हापूर येथे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. लोकहितवादी ,आदर्श जनतेचा राजा छत्रपती शाहू महाराज ज्यांनी अपृश्यता निवारण, लोकशिक्षण, समता ,बंधुता व कलागुलांना प्रेरणा देत समाजातील उत्कृष्ट व विद्वतापूर्ण रयतेला सदोदित प्रेरणा दिली .अशा या राजाच्या प्रेरणेला सलाम करण्याचा प्रयत्न समाजातील उत्कृष्ट व विद्वत्तापूर्ण लोकांच्या गौरव सोहळा सन्मानित करण्यात आला होता .या सोहळ्याला डॉ. कृष्णदेव गिरी सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ,डॉ. सुशील अग्रवाल, डॉ .सुरेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय राजश्री शाहू प्रेरणा पुरस्कार 2022 देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button