Uncategorized

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ ची ठळक बातमी , पिडीत महिला अत्याचारा प्रकारणी लाखनी पोलीस स्टेशन चे दोन पोलीस अधिकारी निलंबित तर एका महिला कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात तात्काळ बदली

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता*भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिला सोबत दुर्लक्ष केले असता या प्रकरणी मा.लोहित मतानी,पोलीस अधिक्षक भंडारा यांनी लाखनी पोलीस स्टेशन येथील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले तर एका महिला कर्मचाऱ्याची तात्काळ मुख्यालयात बदली केली.त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे दुसरे पोलीस उपनिरीक्षक लखन उईके यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर एका महिला कर्मचारी खोब्रागडे यांची बदली मुख्यालयात करण्यात आली.

सविस्थर व्रुत्त असे की बहीनीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात निघून गेलेल्या पिडीत 35 वर्षिय महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याप्रकरणी घटना कारधा थानामार्फत सकाळी 2 अँगष्ट ला उघडणीस आली त्या प्रकरणी दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.

पिडीत महिला 31जुलै ला लाखनी पोलीस ठान्यात आली होती.मात्र पोलिसांनी तिच्याकडे लक्ष न दिल्याने ति पोलीस स्टेशनमधुन पळून गेली.त्यामुळे या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.पिडीत महिला बहिणीच्या घरुन 30 जुलै ला निघाली असता,आरोपी क्रमांक 1 ने गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मुरदोई गावाच्या जंगलात महिलेवर अत्याचार केला.31 जुलै ला पुन्हा पडसगावच्या जंगलात नेऊन अत्याचार केला व लाखनी पोलीस स्टेशन मुरमाळी रस्त्यावर पाई जात असताना कन्हमोह गावातील धर्मा धाब्यावर पोहोचली असता पंचर दुकानदाराला आपबिती सांगितली पंचर दुकानदाराने तिला सुरक्षित घरी पोहविचो असा विश्वास दिला मात्र या आरोपी ने जवळच शेतात घेउन गेला व अत्याचार पिडीत महिलेवर केले व पंचर दुरुस्ती करणारा तिथे आला व दोघांनी रात्रभर पिडितेसोबत अत्याचार केले.2अँगष्ट रोजी महिलेला कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सोडून दिले.

दुसऱ्यांदा लाखनी पोलिसांच्या अलगर्जीपणामुळे हे क्रुत्त घडलेअसे उघडणीस आले.पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील सा.करित आहेत.दोशी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button