Uncategorized

केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा ,ओळखपत्र वितरण व सन्मान चिन्ह वितरण कार्यक्रम संपन्न

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
★पोलीस कि आवाज★
संजीव भांबोरे
भंडारा (आल इंडिया प्रतिनिधी )- स्थानिक विश्रामगृह भंडारा येथे केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्ली शाखा भंडाराच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा , आयडी ओळखपत्र वितरण, सन्मान चिन्ह वितरण कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाचे उद्घाटन सरकारी वकील अमर चवरे नागपूर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माझी इंजिनियर रूपचंद रामटेके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र लाईव्ह चॅनेलचे मुख्य संपादक शशिकांत भोयर ,प्रवीण कोलेश्वर अध्यक्ष अमरावती जिल्हा यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिरुद्ध भोयर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा जिल्हा अध्यक्ष मिलिंद रामटेके यांनी केले तर आभार विदर्भ अध्यक्ष मनोज चवरे यांनी मानले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सौरभ रामटेके ,लक्ष्मीकांत निमजे ,मनीषा फुंडे, कृपाल मेश्राम ,व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button