Uncategorized

भंडारा तहसील कार्यालय बचत भवन येथे राशन दुकानदारांची सभा संपन्न

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील राशन दुकानदारांची सभा बचत भवन तहसील कार्यालय भंडारा येथे आज दिनांक 25 जुलै 2022 रोज सोमवारला दुपारी तीन वाजता पार पडली .या सभेला जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड ,भंडारा येथील तहसीलदार हिंगे साहेब, त्याचप्रमाणे तालुका अन्नपुरवठा निरीक्षक आनंद पडोळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेला मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण रास्त भाव दुकान आय .एस .ओ . मानांकन करावयाच्या दृष्टिकोनातून दुकानदारांनी आपल्या दुकानाला पांढरा चुना मारून स्वच्छता ठेवावी त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयाचे पालन करावे असे सांगितले .यावेळी तालुक्यातील संपूर्ण राशन दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button