Uncategorized

अड्याळ परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी पिण्याची वेळ

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
“पोलीस की आवाज” न्यूज नेटवर्क ::::

  • पाणी पुरवठा योजना ठप्प
  • नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ सततच्या पावसामुळे तालुक्यात बहुतांश सर्वच भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. वैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी अड्याळ परिसरातील नागरिकांचा पिण्यासाठी स्वच्छ-शुद्ध पाण्याचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. मुसळधार पावसामुळे नळाद्वारे येणारे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे एकतर विकतचे पाणी घ्यावे लागते किंवा गढूळ पाण्यावरच समाधान मानावे लागते.
गढूळ पाण्यामुळे रोगराईची शक्यता असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाणी पुरवठा गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने पावसाळ्यात गढूळ पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विहिरीच्या पाण्यावर समाधान मानावे लागते. साधारण पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आणि तेव्हा पासूनच अड्याळ परिसरात नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे यावर तात्काळ उपाय योजना करून नागरिकांना पिण्यास शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button