Uncategorized
निल्लोड सेवा सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात
नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात सत्कार
*सिल्लोड* ( पोलीस कि आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी शेख चांद ) दि. 12, सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे भगवान गोराडे तर व्हाईस चेअरमनपदी माजी सरपंच नारायण आहेर यांची निवड झाली. आज बुधवार ( दि.12 ) रोजी नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
निल्लोड येथील सोसायटीच्या निवडणुकीत 13 पैकी 9 जागेवर शिवसेना प्रणित पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने निल्लोड येथील सोसायटीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले होते. आज चेअरमन , व्हाईस चेअरमन निवडीसाठी प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदी भगवान गोराडे तर व्हाईस चेअरमन पदी नारायण आहेर यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर , भवन सर्कल प्रमुख विश्वास दाभाडे आदींसह नवनिर्वाचित चेअरमन भगवान गोराडे, व्हाईस चेअरमन नारायण आहेर, संचालक रावसाहेब गोराडे, गिरजाराम खटाळ, अक्षय मगर, संगीता विष्णू गोराडे, शामराव जोगदंडे, सुरेश आहेर, प्रकाश शेवाळे तर निल्लोड येथील माजी पं. स.सदस्य उत्तम शिंदे, विश्वनाथ खटाळ, कल्याण गोराडे, सुभाष गोराडे, दादाराव मगर, सुखदेव आहेर, रफिक बागवान, पूर्णाजी मगर, विष्णू आहेर, दिगंबर गोराडे, द्वारकादास आहेर, नाना गोराडे, मिठठू गोराडे, कचरू भोजने, राजू आहेर, दिलीप मगर, अरुण मगर आदींची उपस्थिती होती.

