Uncategorized

भारतातील नंबर वन न्युज ■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्री मा.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केन्द्रीय ग्रुहमंत्री मा.अमीत शाह ,भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी. नड्डा व केन्द्रीय मंत्री मा.राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी माध्यमांशी संवाद साधला. या संवादाच्यावेळी मी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:

  • काल आणि आजच्या आमच्या दिल्ली दौर्‍याचा फार काही राजकीय अजेंडा नाही. आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेत आहोत. मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि केंद्रीय मंत्री मा. राजनाथसिंग जी यांच्या भेटी घेतल्या.
  • आज दुपारनंतर आम्ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेणार आहोत. त्यांचे आशिर्वाद घेत त्यांचे व्हीजन जाणून घेणार आहोत.
  • आम्ही मा. उपराष्ट्रपतीजी यांची सुद्धा वेळ मागितली होती. ते सध्या कर्नाटक दौर्‍यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र त्यांनी दूरध्वनीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पुढच्या काळात निश्चितपणे वेळ देण्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.
  • मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मला मुख्यमंत्रीपदापर्यंत संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे.
  • खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे.
  • दिल्ली दौर्‍यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button