जागृती विद्यालयात “ वारी पंढरीची ”चे आयोजन
पंकज वानखेडे अड्याळ/पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::
कोंढा – जागृती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोसरा येथे आषाढी एकादशी निमित्ताने “ वारी पंढरीची” चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जयेश पाऊलझगडे व कु.मोनिका कांबळी या विद्यार्थ्याची विठ्ठल व रुक्मिणी आणि वारकरी यांची मनोवेधक वेशभूषा करण्यात आली होती.याप्रसंगी प्राचार्य शंकर गायकी यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून वारीला प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शंकर गायकी होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्य शुभम कुर्झेकर, लोकेश गभणे सामाजिक कार्यकर्त्या, व्हि.सी.केरझरकर, एस.के.ठवरे, पी.एस.दुपारे, पी.टी.भुसारी, प्रा.सुनिल मने, प्रा.अमोल वंजारी, प्रा.राहूल कुर्झेकर ,कु.एम.बी.भुते, अभिषेक रत्नपारखी, कु.एस.के.गिऱ्हेपूंजे, कु.नागपूरे, उपस्थित होते.
विठ्ठल नामाचा गजर करीत कोसरा गावातून वारी काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी वारीचे उस्फुर्तपतपणे स्वागत केले.अनेक शिक्षक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी बरोबर सेल्फी घेवून आठवणी संग्रहित केल्या.संपूर्ण गावातून वारी भ्रमण करुन आल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येवून वारीची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी कु.जयश्री कामथे,गणेश जिभकाटे, सुमित भुरे, रसिक नागपूरे, रुपेश तलमले, महेश बावने,साहिल नखाते,कुंदल वनिकर, यादव कामथे, गणेश गरपडे यांनी वारीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन व आभार राहूल कुर्झेकर यांनी केले.


