देशिंग येथे क्रुषी संजीवनी सप्ताह संपन्न
देशिंग येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न
घाटनांद्रे/वार्ताहर :- देशिंग (ता कवठेमहांकाळ) तालुका येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत एक दिवसीय शेतकरी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंडल कृषी अधिकारी व्ही व्ही पवार यांनी खतांचा समतोल वापर या विषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले.तर कृषि पर्यवेक्षक डी एस पाटील व बोरगावचे कृषी सहायक श्री योगेश जगताप यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.त्याचबरोबर देशिंगचे कृषी सहाय्यक व्ही पी शिंदे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी मार्गदर्शन करताना या योजने विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी नितीन पाटील, राजकुमार गुरव,संभाजी गुरव, संदीप इरळे,संपत भोसले, बापुराव निकमसह मोठया संख्येनं शेतकरीवर्ग उपस्थित होता.स्वागत नितीन पाटील यांनी तर आभार कृषी सहाय्यक विजय शिंदे यांनी मानले.
(फोटो ओळी :- देशिंग (ता कवठेमहांकाळ) येथे उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना व्ही व्ही पवार सोबत डी एस पाटील.)

