उसर्रा येथील पुलाजवळील बांधकामात अधिकाऱ्यांनी अभियांत्रिकी ची लावली वाट-राजेंद्र पटले
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे चीफ एडीटर *राजेश ऊके* यांना मिळालेल्या माहितीनुसार मुद्दा अतिशय गंभीर आहे, मनसर – तुमसर – गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पहाडासारखा भयंकर उंच बांधण्यात आलेल्या उसर्रा गावाजवळील पुलाचे भवितव्य दोन वर्षांपासून अंधारात आहे ? अधिकाऱ्यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार उभी आहे, सदर पुलाचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्यांना गावकऱ्यांचा आव्हान आहे की मान्य केल्यानुसार VNIT व्दारे थातुरमातुर नाही तर detailed hydraulic design & drawings करवून घेऊन यावे व बिनधास्त त्यानुसार बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करावे,परंतु अधिकाऱ्यांना १०० % खात्री आहे की झालेली चूक माफ करण्यासारखी नक्कीच नाही, अधिकाऱ्यांना खूप भिती आहे की VNIT व्दारे पुलाचा रहस्य बाहेर निघाल्यावर अनेक अधिकारी निलंबित/पदमुक्त होतील, याच कारणामुळे अधिकारी स्वतः खूप चिंता ग्रस्त आहेत म्हणून टाईमपास करत आहेत, हि खरी खरी वास्तविकता आहे, कारण स्पष्ट आहे नाल्याच्या नॅचरल बेड च्या वर १.५० मीटर उंच राॅफ्ट बांधला आहे, पुल भयंकर पहाडा सारखा उंच बांधला आहे, याच नाल्यावरील २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाईप कलवर्ट च्या वरून कधीच अतिवृष्टी चा पुर गेला नाही व आवश्यकता नसतानाही १० मीटर चे दोन गाळे बांधून अभियांत्रिकीची सर्रास वाट लावली आहे, त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा चुना लागला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे व म्हणूनच अभियंत्यांना १००% विश्वास आहे सदर पुल आता नक्कीच तुटेल, मोक्यावर शेतकऱ्यांना होत असलेला त्रास कुणाला पण पाहून होत नाही, असे अनेक स्पष्ट ‘ न ‘ मिटणारे पुरावे अजुनही अस्तित्वात आहेत, दोन वर्षांत अनेक अपघात झाले आहेत पुढे होऊ नये म्हणून त्वरित चूकलेला बांधकाम तोडून योग्य बांधकाम सुरू व्हावे यासाठी दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरु आहे, संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावे हिच गावकऱ्यांची मागणी आहे !




