सलील देशमुख जि.प.सदस्य यांच्या प्रयत्नाने बांधकामाचे लोकार्पण
प्रतिनिधी राजेंद्र खामकर (कोंढाळी)
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क
शेकापूर,गणेशपूर , कलमुंडा रस्ता बांधकामाचे लोकार्पण सोहळा
मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेकापूर ते कलमुंडा रास्ता व शेकापूर ते गणेशपूर रस्ता दैनंदिन उपयोगी रस्ता बांधकामाची सरपंच नरेश नागपुरे यांनी मेंटपांजरा जि प सदस्य सलील देशमुख व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांच्या कडे सातत्याने मागणी व पाठपुरवठा केला होता या समश्याची दखल जि प सदस्य सलील देशमुख यांनी घेत जिल्हा नियोजन व 3054 या योजनेअंतर्गत ऐकून 50 लक्ष रुपयेचा निधी मंजूर केला या रस्ता बांधकामाचे काम पूर्ण होताच लोकार्पण सोहळा नुकताच माजी जि प उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व जि प सदस्य नागपूर सलील देशमुख व रिधोरा प स सदस्य संजय डांगोरे, सामाजिक कार्यकर्ता जयंता टालाटूले ,सरपंच नरेश नागपुरे खंडविकास अधिकारी संजय पाटील,,यांच्या प्रमुख उपस्थिती समपन्न झाला तसेच रिधोरा पंचायत समीती अंतर्गत विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन, व लोकार्पण सोहळा कार्यक्रम घेण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे आकाश गजबे बंडू राठोड, उप सरपंच प्रकाश सर्याम, ग्राप सदस्य गजानन परतेती,संदीप राऊत, निताबाई चरडे ,वैशाली कौरती,जैतुला कर्नाके,आशाबाई वरखडे मानिराम धुर्वे,शयामराव ठाकरे,ईश्वर नागपुरे,लक्ष्मण राऊत,पुंडलीकराव वैदय व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते यावेळी गावातील रस्त्याची समाश्या सोडविली याबद्दल सरपंच ग्राप, कर्मचारी व गावकरी यांनी माजी गृह मंत्री अनिल देशमुख व जि प सदस्य सलील देशमुख यांचे आभार मानलें.
*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क च्या बातम्या दररोज पाहण्यासाठी ग्रुपमध्ये जाईन व्हा.