क्राइम
विहरीत पडून एक ईसमाचा मृत्यू…
तुमसर तालुक्यातील रुपेरा गावची घटना
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुपेरा गावात विहरीत पाणी काढत असताना अचानक तोल गेल्याने मंगेश हिवराज मरस्कोल्हे ता. तुमसर हा 39 वर्षिय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तो नेहमीप्रमाणे घरगुती वापरासाठी घरामागील शेतात असलेल्या विहरीवर पाणी काढायला गेला असताना अचानक त्याचा तोल विहरीत गेल्याने मंगेश चा मृत्यू झाला. यावेळी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय पोस्टमार्टम रिपोर्ट वरुन पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशन चे ठानेदार विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. साईराम गयगये करीत आहेत.



