भंडारा/तुमसर (पंचायत समिती वार्ता) :- सकाळ च्या दरम्यान 26 एप्रिल ला तुमसर पंचायत समितीच्या नवीन रेकार्ड रुमला भिषण आग लागली. रेकार्ड जळुन खाक झाले. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्यापही कळले नाही. रेकार्ड रुमला आग लागणे , आगीमध्ये रेकार्ड जळुन खाक होणे हा काही सडयन्त्राचा तर भाग नाही ❓ अशी चर्चा तुमसर तालुक्यात तसेच भंडारा जिल्हात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपीका सुमित गौपाले यांनी प्रशासनाला चौकशी ची मागणी केली की ह्या रेकार्ड रुमला लागलेल्या आगीची काटेकोरपणे चौकशी व्हावी .