पिडीत चौधरी परिवारास योग्य न्याय पाहिजे!
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
पोवार समाजात एक हृदयस्पर्श घटना
=========================
माझ्या समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे ,श्री दिपककुमार रुपराज चौधरी मु बेल्हाटी तिरोडा यांना सर्प डसल्यामुळे विषबाधा झाली ,त्यांना उपचारात्मक दृष्टि ने दि १२-०५-२०२२ रोज गुरुवारला नागपुर चे नामवंत स्टार सिटी हास्पिटल मानेवाडा रोड येथे दाखल करण्यात आले होते ,पण शोकांतिका असी की स्टार सिटी हास्पिटल च्या लापरवाहीं मुळे ऋग्ण मृत्यु मुखी पडले , हा दुःख द समाचार जेव्हा पोवार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री आदरणीय येजेन्द्रजी ठाकुर व श्री आदरणीय कुमेश्वरजी भगत व श्री हिरदीलाल ठाकरे व समस्त पोवार समाजाचे कार्यकर्ते यांच्या निदर्शनात आले असता त्यांनी तत्वरित स्टार सिटी हास्पिटल गाठला व हास्पिटल चे प्रमुख डाक्टर श्री बडवाईक यांच्याशी चर्चा करुन संशय व्यक्त करुन प्रामुख्याने आय सी यु चे सी सी टिव्ही फुटेज ची चौकशी केली ,सी सी टिव्ही फुटेज ची चौकशी केली असता आम्हाला स्टार सिटी हास्पिटल चे कर्मचारी यांची लापरवाही लक्षात आली आणि आमचा सरळ सरळ त्यांच्यावर आरोप होता की आमचा ऋग्ण तुमच्या लापरवाही चा शिकार झाला आहे , सामाजिक कार्यकर्ते व पोवार समाजाचा जनाक्रोश पाहुण स्टार सिटी हास्पिटल चे डाक्टर श्री बडवाईक व त्यांचे कर्मचारी यांनी आपल्या लापरवाही ची माफी मागीतली, सामाजिक कार्यकर्ते व पोवार समाजाचा आक्रोश पाहुण ऋग्णा चे भरलेले पैसे व उर्वरित रक्कम माफ केली , आणि या पुढे असा कधीच होणार नाही असा आश्वाशन सुद्धा दिला , या दुःखाच्या वेळी पोवार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व समस्त पोवार समाजाचे सदस्य उपस्थित होते , मी हिरदीलाल नेतरामजी ठाकरे नागपुर सर्वानां नतमस्तक विनंती करतो कधी ही कोणत्याही हास्पिटल च्या डाक्टरावर व कर्मचारी वर डोळे बंद करुन विश्वास करु नका , तुम्हाला तुमच्या ऋग्णा विषयी जानकारी घेण्याचा पुर्ण अधिकार आहे , जर तुम्हाला हास्पिटल चे प्रमुख डाक्टर व नर्स कीवा वाडबाय तुमच्या ऋग्णा विषयी जानकारी देण्यात निष्काळजी दाखवत असतील तर त्वरित पोवार समाज संगठन नागपुर च्या सर्व समाज बांधवाना सुचना द्यावी हिच अपेक्षा जय माहामाया गढ़कालिका जय राजा भोज !!
सो.मेघा सुनिल बिसन
पत्रकार गोंदिया जिल्हा प्रतिनिधि
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
==================================================