Uncategorized

विषबाधा झाल्याने ६ शेळ्यांचा अचानक मृत्यु…

खापाः येथील चरायला गेलेल्या शेळ्यांना विषबाधा होवुन ६ शेळ्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर २०२४ ला दुपारी ४ः४५ ते ५ः०० वाजे च्या सुमारास घडली.

टवरचंद हाडगे व राजू हलमारे मुक्काम खापा यांच्या एकुन ६ शेळ्या मृत्यु पावल्या, दोन्ही परिवारांची उपजीविका हि गरीबांची गाय म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शेळी व्यवसायावर अवलंबून आहे. टवरचंद हाडगे हे दिंव्याग असुन त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सदर घटनेमुळे दोन्ही परिवारावर दुःखाचे पहाड कोसळले. सदर घटनेची माहीती दिंव्याग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणविर यांना माहीती मीळतीच त्यांनी व त्यांच्या चमुनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तातडीने पशुवैध्यकीय अधिकारी डॅा. मनोजकुमार नंदेश्वर (पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१) यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे चर्चा केली व त्यांनी तात्काळ त्यांचे प्रतीनीधी डॅा. थोरात यांना घटनास्थळी पाढवुन त्यांनी ६ शेळ्यांना मृत घोषित केले व उर्वरित बिषबाधा झालेल्या शेळ्यांचा तातडीने औषधोपचार केला.
यावेळी श्री गणविर यांनी झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी डॅा.नंदेश्वर यांच्या माध्यमातुन शासनाकडे मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button