वाघाने केली मनुष्य प्राण्याची शिकार…!
वेळीच उपाय योजना केली असती तर ही घटना टळली असती
भंडारा जिल्हा वनविभाग वार्ता:-लेंडेझरी, नाकाडोंगरी तुमसर व कान्द्री वन परिक्षेत्रात हिंसक प्राणी जसे वाघ, बिबटआपल्या भोजनासाठी प्राण्यांचे जीव घेऊन आपली भुख भागवितात . नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात तर कित्येक दुधारु गाई म्हशी यांचे भक्षण केले परंतु आता तर वाघ मनुष्य प्राण्याची सुध्दा शिकार करु लागला. भंडारा वनविभागातील वरीष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक, तसेच मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी तुमसर वनविभागाने बारकाईने लक्ष केंद्रित करुन मनुष्य हानी होऊ नये ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वाघाने मनुष्य प्राण्याची शिकार करून त्याचे देह भक्षण केल्याची घटना कान्द्री रेंज मधील पिटेसुर गावात घडली.
सरपंच पिटेसुर यांनी भंडारा वन विभाग यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली की सोरणा काठावर लक्षम डोमा मोहनकर याला वाघाने ठार केले आहे.
त्यानंतर रीतेश भोंगाडे सहा. वनसंरक्षक हे आपल्या टीम सोबत घटना स्थळी पोहचले. त्यावेळी कु. अपेक्षा शेंडे वन परिक्षेत्र अधिकारी ह्या होत्या. मा. रीतेश भोंगाडे यांनी वनक्षेत्र कर्मचारी यांच्या सोबत मृतदेहाचा शोध लावला. त्यावेळी त्यांना वाघाचे पगमार्ग दिसून आले व मृत्यु देह सापडले.मृत्यू देह सापडल्यावर शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना स्वाधीन करून शासकीय नियमानुसार दहा लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
पुढील तपास मा. श्री. राहुल गवई उपवनसंरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली रितश भोंगाडे सहा. वनसंरक्षक भंडारा हे करीत आहेत.




