Uncategorized

मोहफुल दारु वर कारवाही…!

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील सर्व च पोलीसला सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यावर

SP नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही होत आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अवैधरित्या करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. त्यांना थोडीही भनक लागल्यास त्वरित आपल्या टीम सोबत जाऊन कार्यवाही करतात.
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा च्या माध्यमातून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पवनी उपविभाग येथील अवैध धंदे समुळ नष्ट करण्यासाठी अधिकारी व अधिकारी यांचे पथक नेमण्यात आले.

सदर पथकात पोहवा. नितीन महाजन, पोहवा राजेश पंचबुधे, पो. अंमलदार मंगेश माळोदे यांनी गोपनिय माहिती च्या आधारे अड्याळ शेतशिवारात नाल्याच्या किनारे हात भट्टी ची दारू गाळत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपी नामे मुन्ना उर्फ जेगो कुभंलकर राह मंडईपेठ , अड्याळ यांच्या ताब्यातून मोहफुल दारु प्लास्टिक ड्रममध्ये 12,00 कि. ग्रा. ज्याची किंमत 2,40,000/- रु.दुसरे साहित्य 10,00 0/-असा एकुण 2,50,000 रु. मुद्देमाल नास करून आरोपी विरुद्ध अड्याळ पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 237) /2024 कलम (फ) महा. दारू बंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


तसेच भंडारा जिल्हात अनेक ठिकाणी वेगवेगळे पथक अवैध धंद्यावर कार्यवाही करीत आहेत.


ह्या कार्यवाही मुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन अतीशय सतर्कतेत आहेत.


मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन वर बारकाईने लक्ष केंद्रीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button