Uncategorized
SP नुरुल हसन यांचे सभेला मार्गदर्शन…
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस स्टेशन पालांदुर येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी मनोज सिडाम, पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा विवेक सोनवणे यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव व ईद- ए – मिलाद निमित्ताने शांतता समीती ची बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत प्रामुख्याने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, गणेश उत्सव समीती चे अध्यक्ष व सदस्य पत्रकार, मस्जिद समीती चे सदस्य, शांतता समीती चे सदस्य, महिला दक्षता समिती चे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच विविध जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते. गणपती उत्सव दरम्यान जिल्हातील शांततेत बाधा निर्माण होणार नाही आणि कायदा,व सुव्यवस्था कशी टीकुन राहिल याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले व अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
