Uncategorized
बातमी प्रकाशित होतच दखल घेतली तुमसर आगाराने …!

भंडारा जिल्हा:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय भंडारा अंतर्गत येणाऱ्या तुमसर आगाराने पोलीस कि आवाज न्युज मध्ये बातमी प्रकाशित होताच सायंकाळी 6.15 वाजे. बस सेवा सुरू केली.
सविस्तर वृत्त असे की कित्येक दिवसापासून तुमसर ते बावनथडी मार्गावरील सांयकाळी व सकाळ ची बस फेरी बंद असल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता.

काही कालांतराने बहुजन मराठी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश ऊके यांनी डेपो व्यवस्थापक मा.कन्हैया भोगे साहेबांना संघातर्फे निवेदन देण्यात आले.

मा. भोगे साहेबांनी विभागीय कार्यालय भंडारा येथे (विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी तनुजा अहिरकर मॅडम यांना निवेदनाचा पाठपुरावा करुन विभागीय कार्यालय भंडारा पाठवुन सायंकाळी 6.15 वाजे.बस फेरीची व्यवस्था केली असल्याने तुमसर-बावनथडी मार्गावरील प्रवाशांची सुविधा झाली.