शांतीचा संदेश देणारा रमजान.
🔹 मानसा…मानसात कोणत्याही प्रकारचे भेद करु नये.
🔹 विविधतेने अधोरेखित असतो रमजान .
शांतीचा संदेश देणारा रमजान.
🔹 मानसा…मानसात कोणत्याही प्रकारचे भेद करु नये.
🔹 विविधतेने अधोरेखित असतो रमजान .
नागपूर/ चक्रधर मेश्राम दि.२/५/२०२२
रमजान हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा,सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे. मुस्लीम धर्माचे पालन करणार्या प्रत्येकांसाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे.
माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये, माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलून त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म तिरस्कार करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण आहेत. त्यासाठी त्यांना त्या दिवसात चांगले विचार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार केल्या जाते.
हिंदू धर्मातील लोक मोठ्या संख्येने श्रवण पाळतात. त्या महिन्यात पोथ्या, पुराण, धर्मग्रंथ वाचतात. काही आठवडे सोमवार कडक उपवास ठेवतात, दाढीदेखील करीत नाही. नंतर गटारी अमावस्या साजरी करतात. बौद्ध धम्म मानणारे लोक वर्षावास तीन महिने पाळतात. तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, त्रिपिटक सारखी ग्रंथ सामुदाहिकपणे वाचतात. नंतर धम्माला शरण जातात पण संघाला शरण जात नाही. म्हणजेच पंचशिलेचे पालन करीत नाही.
असाच मुस्लिम समाजातील रमजान महिना असतो.तो समाजाला,शांती समता व स्वातंत्र्य मिळवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवितो, त्यासाठी कडक उपवास म्हणजे रोजा पकडला जातो.प्रत्येक धर्माचे हे सण मोठया संख्येने साजरे केले जातात.तेच सण दरवर्षी नवीन प्रेरणा घेऊन येतात. तरुणांना धार्मिक रितीरिवाज, संस्कार, सांस्कृतिक वारसा देऊन जातात.श्रावण महिना, वर्षावास, आणि रमजान काय आहेत हे स्मार्टफोन वापरणार्यांना त्यांचे महत्व कळणार नाही. त्यासाठी त्याचे त्यांना पालन करावे लागेल.
हिंदू धर्मात श्रावण पाळण्याचे सांगितले आहे. बुद्ध धम्मात वर्षावासात पंचशिलेचे पालन करायचे सांगितले आहे. महंमद पैगंबर रमजानच्या पवित्र महिन्यात काय करायला सांगतात. पाहिले इमान, दुसरा नमाज, तिसरा रोजा, चौथा हज आणि पाचवा जकात ही पाच कर्तव्ये प्रत्येकाने पाळली पाहिजे. श्रावण महिन्यात, वर्षावासात आणि रमजानमध्ये लहान मुलामुलींना धर्माचे संस्कार व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली जाते. चांगला नागरिक बण्यासाठी या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला जात, धर्म, प्रांत, भाषा, वेशभूषा कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच रमजान हा केवळ इस्लाम मानणारा मुस्लिम समाज व मुसलमान हेच साजरा करू शकतात असे नाही.
पंचशिलेचे पालन करणारा कोणीही असू शकतो. इस्लाममध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्याचे पालन करणारा कोणीही असू शकतो.माणसाला माणसासारखे वागविण्याची शिकवण देणारा धर्म व धम्म जगात ओळखला जातो. जो माणसासोबत माणसासारखा वागत नसेल तर तो माणूस असू शकत नाही. तो ब्राम्हण असू शकतो. म्हणूनच माणसं ओळखण्यासाठी धर्माची, धम्माची शिकवण मुलामुलींना लहानपणापासून दिली पाहिजे. सर्वच मुस्लिम मुसलमान नाहीत. जो मुसलमान पांच कर्तव्याचे पालन करत नसेल तर तो इस्लाम मानणारा असू शकत नाही. इस्लाम मानणारा मुस्लिम इमानदार, नमाज पडणारा, रोजा ठेवणारा, हज करून आलेला आणि न चुकता समाजाच्या उन्नतीसाठी दरवर्षी जकात भरणारा असतो. मानव प्राण्यावर नेहमी प्रेम करतो. सहानुभूती दाखवितो आणि नियमितपणे सहायता करतो.
रमजानमध्ये रोजा पकडणे म्हणजे सर्व वाईटावर विजय मिळविण्यासाठी तयार करणे होय.रोजा पकडला असेल तर वाईट मार्गापासून दूर राहिले पाहिजेच व वाईट लोकांच्या जवळपास थांबायला मनाई असते. रोजा जेव्हा पकडला जातो तेव्हा भूख, तहान काय असते यांची त्यांना जाणीव होते त्यामुळेचा भुकेल्या, तहानलेल्या माणसाला पाहून रोजा पकडणार्याच्या मनात दया येते. सकारत्मक विचाराचे मनात घर पक्के होते. त्यातुनच दान करण्याची इच्छा होते. त्यामुळे मनाची एकाग्रता लागते. उत्पन्नात मोठी वाढ होते. रोजा सुरू असतानांच वर्षभराची जकात भरली जाते. रोजा पकडणार्या व्यक्तीबद्दल समाजात आदर निर्माण होतो. खोटे बोलून फसवणूक, हिंसा, निंदा, चुगली, भ्रष्टाचार करणे यापासून वेगळे राहण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच एक महिन्याच्या रोजात या सर्व वाईट गोष्टी पासून वर्षभर दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. त्यामुळे तुम्ही वाईट कामापासून स्वतःचे रक्षण करू शकता त्यापासून दूर राहू शकतात. अल्ला खुदाचे अस्तित्व मान्य करा त्यांची मनात आदरयुक्त भीती निर्माण करा. त्यामुळेच सर्व क्षेत्रातील मुसलमान अमीर,गरीब उच्च शिक्षित मशिदीत एक लाईन मध्ये नमाज पडायला उभे राहतात.जो जसा येईल तो तसाच लाईनमध्ये उभा राहून नमाज पडतो. त्यांच्या मनातील सर्व विकार नष्ट होऊन विनम्रपणे तो सर्वच्यामध्ये उभा राहतो तेव्हा तो फक्त पांच कर्तव्य पार पाडणारा माणूस असतो.
मशिदीत सर्व सामान असतात सर्वांना सामान स्वातंत्र्य असते. हिंदूंच्या मंदिरात असे पाहण्यासाठी मिळेल काय? ब्राम्हण सर्वश्रेष्ठ, जास्त पैसे देणारा दानशूर समाजसेवक मग तो किती भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारा असो तो मोठा भक्त ठरतो. हिंदू धर्मात वर्णाला महत्व आहे. ब्राम्हण बनिया सर्व श्रेष्ठ असतात बाकी शूद्र, अतिशूद्र. शूरवीर, असले तरी ते समता, स्वातंत्र्य व अधिकारांचे हकदार नसतात. हेच संस्कार लहानपणापासून शिकविले जाते. त्यामुळे मोठे झाल्यावर ही मुलं मुली मोठे अधिकारी झाल्यावर त्यांच्यात लोकशाही, मानवाधिकार किंवा माणसाला माणसासारखे पाहण्याचा दृष्टिकोन नसतो
रोजा पकडणारा एकदा रोजा पकडला तर जिवंत असेपर्यंत रोजा पकडतो.आरोग्य ठीक नसेल तरी तो नमाजाच्या वेळी जिथे असेल तिथे डोळे बंद करून हात जोडून आपले कर्तव्य पार पाडतो. आजूबाजूला कोणतेही वातावरण असू द्या त्याला त्यांच्या कर्तव्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणूनच रमजान महिन्यातील दिवस हे मनात कटुता न ठेवता सर्वांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्याचे असतात.
‘प्रेम दिल्याने वाढते’ असे म्हणतात. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून विविध धर्मीयांमध्ये प्रेम वाढीस लागावे, अशी अपेक्षा असते. डिजिटल इंडिया, स्मार्टफोनच्या आजच्या वातावरणात ती आता काळाची गरज ठरू पाहत आहे. यातूनच विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. रोजे म्हणजे फक्त उपवास किंवा उपाशी राहणं नव्हे तर या काळात रोजेदाराने काही मानसिक आणि व्यावहारिक नियम पाळणेही बंधनकारक असते. रमजानच्या काळात डोळे, कान आणि तोंडाचा चुकीचा वापर वर्ज्य आहे. म्हणजेच वाईट ऐकणे, बघणे किंवा बोलणे या तिन्ही गोष्टींना या काळात मनाई असते. रोजा म्हणजे रोखणे. परंतु या काळात केवळ तहान-भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी दूर करण्याची प्रेरणा देऊन जाणारा उत्सव असतो. आता त्यात चांगले घेणारा चांगलेच घेणार! वाईट विचार करणार्या माणसाला तुम्ही किती चांगले सांगा तो या कांनाने ऐकणार व दुसर्या कानाने सोडून देणार.कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वःतापासून करावी लागते. रोजा काळात गरीब, निराधार व्यक्तींची मदत करण्याला मोठे महत्त्व आहे. आपण जो आहार घेतो तोच आहार या व्यक्तींनाही दिला जायला हवा. म्हणून रोजा एकटा माणूस कधीच सोडत नाही. तो सर्वाना सोबत घेऊन सोडला जातो. या. काळात प्रत्येक मुस्लीमांनी सदाचारी वर्तन ठेवणे बंधनकारक आहे. म्हणूनच तर समाजातील सर्व घटक सार्वजनिक ठिकाणी रोजा सोडण्याचा टेबल लावतात. येणारे जाणारे त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात.
कारण हा रोजा घराच्या चारभीतीच्या आत घेणारा व्यक्तिगत सण नाही तर समाजाला योग्य मार्ग दाखविणारा, संस्कार देणारा सण आहे. या काळात खोटे बोलणे, एखाद्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीबद्दल अनुद्गार काढणे, खोटी शपथ घेणे आणि लोभ धरणे या गोष्टींमुळे रोजाचे फळ मिळत नाही. उपवासासोबतच शारीरिक आचरण शुद्ध ठेवणं रमजान काळात गरजेचे असते. हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा,सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा, दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण आहे. मुस्लीम धर्माचे पालन करणार्या प्रत्येकांसाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे. म्हणूनच रमजान म्हणजे काय? प्रत्येक माणसाला माहिती असणे आवश्यक आहे.
आपला धर्म चांगला व इतरांचा वाईट ही भावना कोणत्याही माणसात असता काम नये. भारतात सर्व धर्माचा आदर केला जातो. म्हणून भारताची जगात सर्वधर्मसमभाव मानणारा देश म्हणून ओळख आहे. सहा हजार सहाशे जाती, पोटजातीत विभागलेला हा माणूस म्हणून भारतात गुण्यागोविंदाने राहतो. काही अपवादत्मक लोक समाजाच्या शांतीला सुरुंग लावुन आग लावण्याचे काम करतात. त्यात काही प्रमाणात ते यशस्वी होतात पण ते जास्त दिवस टिकत नाही.
म्हणूनच आपल्या आजूबाजूला कोणत्या धर्माचा माणूस राहतो तो त्या धर्माच्या शिकवणीनुसार वागतो का? जो धर्माच्या शिकवणीनुसार वागत नसेल तर तो सर्वाना मानसिक शारीरिक त्रास देण्यासाठी सार्वजनिक वातावरण दूषित करीत राहील. अशा एका व्यक्तीमुळे सर्व समाज बदनाम होतो.अशा व्यक्तीपासून सावध राहावे ही काळजी सर्व समाजाने घेतली पाहिजे. रमजानचा महिना आणि ईद-उल-फितर निमित्त बांधवांना चक्रधर मेश्राम परिवार आणि आमच्या न्यूज पोर्टल कडून हार्दिक शुभेच्छा!!🌹🌺🌹🌺🌸