शासकीय रेती वाळू डेपो मुळे नागरिक हलाकान…!नाकाडोंगरी ग्रामपंचायत उतरणार रस्त्यावर…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील आष्टी गाव नदिथळाला लागलेला असुन तिथे शासकीय वाळु डेपो शासनाने मंजूर केलेला आहे. ह्या रेती डेपो मुळे ग्रामीण जनता त्रस्त झालेली आहे.

नाकाडोंगरी, च्या मुख्य रस्त्यापासून आष्टी कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सुरू केलेला आहे यामुळे जनतेला रात्रंदिवस त्रास होतो कारण की रात्र आणि दिवसभर ट्रक, टीप्पर ओव्हरलोड भरुन धावत असतात.

रस्त्याच्या बाजूला राहणारे लोकांची ट्रक वाहतुकीमुळे झोप उडालेली आहे. ओव्हरलोड ट्रक च्या वाहतुकीमुळे रस्ता चिखलमय झालेला असून तिथे राहणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे कारण की एखादा ट्रक अनियंत्रित होऊन मोठा अपघात होण्याची घटना नाकारता येणार नाही.

आष्टी व नाकाडोंगरी गावातील लोकांचे खाजगी मकाने व शेती असून त्यांना पायदळ येण्याजाकरिता सुध्दा त्रास सहन करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी सोसायटी वरील नागरिकांनी ही रस्त्याची तक्रार ग्रामपंचायत नाकाडोंगरी कार्यालयात सुध्दा नेली होती.
नाकाडोंगरी गावातील महामार्गाला लागुन पाटबंधारे विभागाची शासकीय जमीन रिकामी आहे त्याठिकाणी डेपो न उघडता कच्च्या रस्त्यावर डेपो सुरु करण्यामागे कोणते उद्देश आहे?
ह्या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेता नाकाडोंगरी ग्रामपंचायत यांना ने तहसीलदार तुमसर यांना निवेदन देऊन सात दिवसात ट्रक ची वाहतूक बंद न झाल्यास सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने महामार्गावरील आंदोलन करण्याचा ईसारा देण्यात आला.
निवेदन देतांना सर्वश्री सुमीत गौपाले सरपंच, विजय राऊत उपसरपंच, सदस्य-निरंजन गौपाले, संजय गौपाले, देवेंद्र मानकर, विश्वकांत घडले, सदस्या-प्रिया रामटेके, भाविका ऊके, प्रिती घडले, राधिका सोनवाने, प्रमिला काशिवार, अनिता भुरे आदी यांचा सहभाग होता.



