क्राइम
पोलीस स्टेशन करडी ची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही

मोहाळी वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार करडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मुंडे यांच्या आदेशानुसार फ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा मुंढरी येथे खाजगी मोटर सायकल ने पेट्रोलिंग करित असतांना ट्रक्टर क्रं. MH-36/L6960 बिना क्रमांक ट्राली रेती वाहतूक करतांना आढळुन आल्याने चालक ग्यानेश्वर शेंडे राह. मुंढरी यांच्या ताब्यातील ट्रक्टर अंदाजे किंमत ३ लाख रुपये तसेच १ब्रास रेती ३,००० रुपये असे एकूण ३,०३००० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून –
फिर्यादी राजेश डोंगरे पोउनि करडी पोलीस स्टेशन यांच्या लेखी रिपोर्ट करून अप क्रं. १००/२०२४, कलम ३७९ भा. द. वि. गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोलीस हवालदार अर्पित भोयर व दाखल अधिकारी प्रफुल वालदे पोहवा करित आहेत.




