Uncategorized

डॉ. आंबेडकर आणि हनुमान जयंती च्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील वरठीत भव्य कार्यक्रम सपंन्न

डॉ.आंबेडकर आणि हनुमान जयंतीच्या निमित्त वरठीत भव्य कार्यक्रम संपन्न ; अभाविपने केले होते आयोजन ; चित्रवेकरांनी केले मार्गदर्शन

वरठी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती व समरसता दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरठीच्या वतीने वरठी परिसर, जिल्हा परिषद शाळा, नंबर वन फिटनेस ॲकॅडमी येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याा स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन हनुमान जयंतीच्या दिवशी 16 एप्रिल 2022 रोजी बाजारहाट हॉल वरठी येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान सेवा पुरस्काराने सन्मानित, भटके-विमुक्त कल्याणकारी संस्थेचे विदर्भ प्रांत संयोजक दिलीप चित्रिवेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.नितीन नवखरे, अभाविप वरठीचे नगरमंत्री रुपेश सपाटे, प्रा.डॉ. प्रमुख अतिथी के तौर पर पुर्व सैनिक विजय पटले, सामाजिक कार्यकर्ता गणेश हिंगे, विकास फाये, मारोतीजी, सानुकुमार तांबेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश हिंगे, विकास फाये, मारोती, सानुकुमार तांबेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली नंतर समरसता या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते दिलीप चित्रिवेकर यांनी समरसतेच्या अशा काहि विशिष्ट पैलूंचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला ज्या पैलूवर बोलताना ईतर मार्गदर्शक टाळाटाळ करतात. सदर विषयावर विविध पुराव्यासहित उदाहरणं देऊन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर अभाविपच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मेघा साखरवाडे हिने सुंदर स्वाक्षरी स्पर्धेत प्रथम क्रमांक, सेजल रंगारी हिने सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक तर पूजा कुंभलकर हिने वक्रता स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
अभाविपचे मनपा सहकारमंत्री कृष्णा भगत, विद्यार्थी प्रमुख श्वेता कढव, गुंजन वैद्य, टीना वैद्य, पाचगाव समिती प्रमुख पिहू आग्रे, शिवानी शहारे, राणी पारधी, विणा हिवसे गोविंदा पशिने यांच्यासह सूरज गावंडे, रवी येरणे, घनश्याम बोंद्रे, रुपेश राघूटे, विष्णू पाटील आदी उपस्थित होते. येणे, हिमांशू पशिने, मनिषा चंद्रिकापुरे, नवप्रभात, अभाविप वरठी सदस्य व हितचिंतकांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रुती लांजेवार, गायन करीना हिवसे व आभार रुपेश सपाटे यांनी मानले.
स्वार्थी करमकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button